पत्रकार विजय वाठोरे यांची कवी विचार मनच शेगाव सेवाभावी संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड
पत्रकार विजय वाठोरे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी( धम्मानंद भेदेकर)
साहित्यातून समाजसेवा करण्यासाठी प्रचिती असलेल्या कवी विचार मंच शेगाव सेवाभावी संस्था अकोला या संस्थेच्या अधिकृत प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार विजय वाठोरे (साहिल),नांदेड यांची निवड करण्यात आली आहे.कवी विचार मंच शेगाव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवशंकर चिकटे यांनी या संस्थेमार्फत अनेक समाजोपयोगी कार्य केलीत व यापुढेही समाजसेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहणारी ही संस्था एक माणुसकीचा खराखुरा जिवंत झराच आहे.देशाच्या विविध आपत्तीमध्ये असो वा इतर कोणत्याही कामासाठी ही संस्था गरजूंसाठी मदत करण्यास सज्ज असते.कोरोना च्या लढ्यासाठी सीएम फंडसाठी या संस्थेमार्फत परिवारातील सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून होईल ती मदत केली व सर्व मिळून पन्नास हजार रुपये सीएम फंड मध्ये जमा केले.हेच नाहीतर असे अनेक समाजोपयोगी कार्य या संस्थेचे सांगता येतील.साहित्यातुन समाजसेवेचा वसा घेतलेल्या या संस्थेचा समाजसेवा करण्याचा आलेख चढताच आहे.श्री शिवशंकर चिकटे हे परिवारातील सर्वांच्या आवडी निवडी जाणून ,त्यांच्यातील खुबी जाणून त्यांना एखादी जबाबदारी देत असतात.तसेच पत्रकार विजय वाठोरे यांच्यातील खुबी जाणून व त्यांचे कवी विचार मंच साठी गेल्या काही वर्षांपासूनचे योगदान पाहता त्यांना कवी विचार मंच च्या अधिकृत प्रसिद्धी प्रमुख पदाची सूत्रे पत्रकारिता क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या दै तुफान क्रांती चे पत्रकार विजय वाठोरे यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सीमेवर भारतमातेच्या रक्षण करण्यासाठी सदैव तयार असलेले जवान श्री शिवशंकरजी चिकटे आणि संतोषजी कोकाटे,नरेंद्रजी जकाते,राधिकाजी देशपांडे,अलकाजी बोर्डे,किशोरकुमार मिश्रा,विद्याजी बनाफर या केंद्रीय समितीतील सर्व सदस्यांच्या सर्वानुमते साहिल यांची प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.पत्रकार विजय वाठोरे यांची निवड झाल्याबद्दल कवी विचार मंच शेगाव परिवारातील सर्व सदस्यांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पत्रकार विशाल जाधव,संपादक विकास गाडेकर ,पत्रकार तथा कवी प्रेम पवळ,दै तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर,दै तुफान क्रांती नांदेड प्रतिनिधी धम्मा भेदेकर,पत्रकार गोविंद गोडसेलवार तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
