Thursday, June 4, 2020

साहित्यजगत वार्ता...

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच नांदेडचे ऑनलाईन कवीसंमेलन संपन्न



हिमायतनगर प्रतिनिधी- विजय वाठोरे
             शिक्षकांच्या आवडी निवडी जोपासण्यासाठी व त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी अग्रेसर असलेले व्यासपीठ अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच नांदेड तर्फे दि ४ जून २०२० रोजी नवोपक्रम अंतर्गत ' कविता मना मनातल्या '  हे ऑनलाईन कवीसंमेलन मोठ्या थाटात पार पडले.
             अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच नांदेडचे समूह प्रशासक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे कविसंमेलन म्हणजे ' कविता मना मनातल्या '  हे होय.या कविसंमेलनासाठी निमंत्रण कवी म्हणून उपक्रमशील शिक्षक नागोराव येवतीकर -धर्माबाद,प्रा.महेंद्र नरवाडे -किनवट,सृजनशील शिक्षिका वंदना मनूरे-भोकर आणि शिक्षक आनंद गायकवाड-नायगाव हे उपस्थित होते.या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन राणी नेम्मानिवार यांनी केले.या कविसंमेलनात प्रथमता उपक्रमशील शिक्षक नागोराव येवतीकर यांनी ' मला आता करमत नाही ' ही शालेय मुलांच्या मनातील व्यथा ,वेदना अन त्यांच्या मनःस्थितीचं नेतृत्व करणारी कविता सादर केली.यानंतर प्रा.महेंद्र नरवाडे सर यांनी त्यांची बुद्धप्रकाश ही कविता सादर केली.जगाला युद्धाची नाहीतर बुद्धाची अन त्यांच्या धम्माची,त्यांच्या शिकवणीची गरज आहे.बुद्धांच्या विचारांचे आचरण केल्यास मानवाचे जीवन सुखकर होईल अश्या आशयाची कविता त्यांनी सादर केली.पुढे शिक्षक आनंद गायकवाड सर यांनी 'आभाला एवढी उंची ' या कवितेतून आई,माय,माऊलीप्रति आपल्या भावना मांडत आईची थोरवी गायली आणि जगी मिळतं सर्वकाही पण आई मिळत नाही,आई तुझ्या उपकाराला आभाळ ही पुरत नाही. अशी कविता सादर केली.यानंतर सृजनशील शिक्षिका वंदना मनूरे यांनी 'जरा विसावू या वळणावर ' ही कविता सादर केली. समूहात उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या ईमोजी व त्या कवितेवर आपल्या प्रतिक्रिया देऊन त्यांना प्रतिसाद दिला.तद्नंतर कविसंमेलनात सहभागी असलेल्या निमंत्रित कवी,कवयित्री यांना ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या कविसंमेलनासाठी अखिल भारतीय साहित्य कला क्रीडा मंच व्हे संस्थापक नटराज मोरे सर, नांदेड शाखेचे जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर सर,मिलिंद जाधव सर,विजय वाठोरे(साहिल),विरभद्र मिरेवाड, रूपेश मुनेश्वर, विजया तारू यासह समुहातील अनेक सभासद ऑनलाईन उपस्थित होते.